epranali

This is educational blog.

Res

Breaking news

सोमवार, १७ जून, २०२४

जून १७, २०२४

16 जून-विज्ञान दिनविशेष

                16 जून-विज्ञान दिनविशेष


★१६ जून १८०१: जर्मन गणिती पदार्थविज्ञानशास्त्रज्ञ ज्युलिअस प्लूकर यांचा जन्म (मृत्यू: २२ मे) 

★१८७८ इथरचा उपयोग करून शस्त्रकर्म करण्याची सुरवात करणारे अमेरिकन वैद्यकशास्त्रज्ञ क्रार्फड विल्यमसन लाँग यांचे निधन (जन्म: १ नोव्हेंबर)

 ★१८९७: नोबेल पारितोषिक विजेते जर्मन रसायनशास्त्रज्ञ जॉर्ज विटिंग यांचा जन्म (मृत्यु २६ ऑगस्ट)

★१९०२ : वैद्यकशास्त्रातील स्वतंत्रपणे नोबेल पारितोषिक मिळविणाऱ्या पहिल्या महिला शास्त्रज्ञा अमेरिकन वनस्पतिशास्त्रज्ञ बारबरा मॅकक्लिंटॉक यांचा जन्म. 'जंपिंग जिन्स' ही कल्पना यांनीच मांडली. यांना 'द डिस्कव्हरी ऑफ मोबाईल जिनेटिक एलिमेंटस' या संशोधन कार्याबद्दल १९८३ सालाचे वैद्यकशास्त्राचे नोबेल पारितोषिक मिळाले.

 ★१९३० : अमेरिकन संशोधक एल्मर अँब्राझी यांचे निधन. यांनी निर्माण केलेला शोधकदीप (सर्चलाईट) सर्व जगात मान्यतेस पावला. तसेच यांनी दिशादर्शक भोवरा (गायरोस्कोपिक कंपास) शोधून काढला. (जन्म: १२ ऑक्टोंबर)

 ★१९७७ : अवकाश संशोधन क्षेत्रातील महान जर्मन अमेरिकन संशोधक वेर्नेर फॉन ब्राऊन यांचे निधन. यांनी अमेरिकेचा पहिला कृत्रिम उपग्रह आणि पायोनियर सॅटेलाईट सिद्ध केले. सन १९७५ मध्ये अमेरिकेने नॅशनल मेडल ऑफ सायन्स हा अत्युच्च सन्मान बहाल केला. हिटलरच्या जर्मनीने नाईट्स क्रॉस हा सर्वोच्च बहुमान देऊन सन्मान केला होता. (जन्म: २३ मार्च)

★१९१९ जॉन अलकॉक आणि ऑर्थर व्हिटेन ब्राऊन यांनी आपल्या विमानातून कुठेही न थांबता अटलांटिक महासागर ओलांडला. अमेरिकेतील न्यू फाऊंडलैंड येथून उड्डाण करून ते आयर्लंडकडे उतरले. 

१९६३ सोवियत रशियाच्या कास्कोड्रम येथून व्होस्टोक-६ या अवकाशयानातून २५ वर्षीय व्हॅलेन्टिना तेरेश्कोव्हाचे अवकाशात पदार्पण. महिला ही अंतराळ प्रवास करण्यास समर्थ आहे, हे तेरेश्कोव्हांनी सिद्ध केले. तीन दिवसात ४८ पृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण करून १९ जून रोजी सुखरूप पृथ्वीवर परत आल्या.

जून १७, २०२४

17 जून-विज्ञान दिनविशेष

                17 जून-विज्ञान दिनविशेष


★१७ जून १७७३ : ब्रिटिश पदार्थविज्ञान व वैद्यकशास्त्रज्ञ थॉमस यंग यांचा जन्म. (मृत्यू: १० मे) 

★१८०० : आयरिश खगोलशास्त्रज्ञ विल्यम् पार्सन्स रॉसी यांचा जन्म. (मृत्यू: ३१ ऑक्टोबर)

 ★१८१४ : ब्रिटिश खगोलशास्त्रज्ञ राबर्ट ग्रँट यांचा जन्म. (मृत्यू: २४ ऑक्टोबर)

★ १८३२ : ब्रिटिश पदार्थविज्ञान व रसायनशास्त्रज्ञ सर विल्यम् क्रूक्स यांचा जन्म. (मृत्यू: ४ एप्रिल) 

★१८६० : ब्रिटिश रसायनशास्त्रज्ञ विल्यम हेन्री पर्किन यांचा जन्म. (मृत्यू: १७ सप्टेंबर) 

★१९२० : नोबेल पारितोषिक विजेते फ्रेंच वैद्यकशास्त्रज्ञ फ्रैंकॉइस जेकॉब यांचा जन्म. यांना 'द जिनेटिक कंट्रोल ऑफ एन्साइम अॅण्ड व्हायरस सिंथेसिस' या संशोधन कार्याबद्दल १९६५ सालाचे वैद्यकशास्त्राचे नोबेल पारितोषिक विभागून मिळाले. यांनी रेग्यूलर जिन्स चा शोध लावला. तसेच आरएनए आणि डीएनए संबंधी महत्त्वाचे संशोधन केले.

★१९४० : नोबेल पारितोषिक विजेते, ब्रिटिश रसायनशास्त्रज्ञ सर आर्थर हार्डेन यांचे निधन. यांनी अल्कोहोलिक फरर्मेंटेशन आणि पाचकरस यासंबंधी मोलाचे संशोधन केले. यांना 'द इन्व्हेस्टिगेशन ऑन द फरमेंटेशन ऑफ ऑफ शुगर अॅण्ड फरमन्टिव्ह एन्झिम्स' या संशोधन कार्याबद्दल १९२९ सालाचे रसायनशास्त्राचे नोबेल पारितोषिक विभागून मिळाले. (जन्म: १२ ऑक्टोबर)

★१९५० अमेरिकेचे डॉ आर एच लॉलेर यांचा किडनी-प्रत्यारोपणाचा पहिला प्रयोग यशस्वी. 

★१९६७ चीनने पहिल्यांदा हायड्रोजन बाँबची चाचणी घेतली.

 ★१९६७ अमेरिकन स्कायलॅब-१ मधील अंतराळवीरांनी अंतराळात २४ दिवस राहण्याचा विक्रम प्रस्थापित केला

जून १७, २०२४

18 जून-विज्ञान दिनविशेष

                18 जून-विज्ञान दिनविशेष


१८ जून १७९९ अमेरिकन खगोलशास्त्रज्ञ विल्यम लॅसेल यांचा जन्म (मृत्यू ५ ऑक्टोबर) 

१८४५: मलेरियास कारणीभूत प्लास्मोडियम सूक्ष्मजीवाचा शोध घेणारे नोबेल पारितोषिक विजेते फ्रेंच वैद्यकशास्त्रज्ञ चार्ल्स लुई लॅव्हेरॉन यांचा जन्म

 १९०५: (मृत्यू: १८ मे) स्वीडिश रसायनशास्त्रज्ञ पर थिओडर क्लेव्ह याचे निधन यांनी थूलिअम आणि होमियम या नवीन द्रव्यांचा शोध लावला. (मृत्यू: १० फेब्रुवारी)

 १९१८ नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ जिराम कार्ल यांचा जन्म यांना 'द आऊट स्टैंडिंग अचिव्हमेंटस् इन द डेव्हलपमेंट ऑफ डायरेक्ट मेथड फॉर द डिटरमिनेशन ऑफ क्रिस्टल स्ट्रक्चर्स' या संशोधन कार्याबद्दल १९८५ सालाचे रसायनशास्त्राचे नोबल पारितोषिक विभागून मिळाले१९३२: नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ डूडले रॉबर्ट हर्शबाख यांचा जन्म यांना 'द कंट्रिब्यूशन्स कसर्निंग द डायनॅमिक्स ऑफ केमिकल एलिमेंटरी प्रोसेसेस' या संशोधन कार्याबद्दल १९८६ सालाचे रसायनशास्त्राचे नोबेल पारितोषिक विभागून मिळाले. 

१९७१: सुप्रसिद्ध स्विस रसायनशास्त्रज्ञ पॉल कारर यांचे निधन. यांना 'द इन्व्हेस्टिगेशन ऑफ केरोटिनॉईड्स फ्लेविन्स अॅण्ड व्हिटॅमिन 'ओ' अॅण्ड 'बी-२" या संशोधन कार्याबद्दल १९३७ सालाचे रसायनशास्त्राचे नोबेल पारितोषिक विभागून मिळाले. (जन्म: २१ एप्रिल) 

★१९८३  सॅली राईड या पहिल्या अमेरिकन महिलेने स्पेस शटलमधून पृथ्वी प्रदक्षिणा केली.

जून १७, २०२४

19 जून-विज्ञान दिनविशेष

                19 जून-विज्ञान दिनविशेष


 १६२३ प्रसिद्ध फ्रेंच गणितज्ञ व तत्त्वज्ञानी ब्लासी पास्कल यांचा क्लेरमॉट फेरॉन येथे जन्म (मृत्यू, १९ ऑगस्ट) 

१८५१ ब्रिटिश पदार्थविज्ञानशास्त्रज्ञ सिल्व्हॅसन फिलीप्स थॉम्पसन यांचा जन्म. 

१८७७ भारतातील नामवंत कृषिशास्त्रज्ञ डॉ. पांडुरंग चिमणाजी थोरात यांचा (मृत्यू १२ जून) जन्म. यांना १०१ वर्षाचे आयुष्य लाभले शेतीमध्ये डॉक्टरेट मिळविणारे शेतकी महाविद्यालयाचे प्राचार्य आणि राज्याच्या शेती खात्याचे संचालक होणारे पहिले भारतीय होय. 

१८९७ नोबेल पारितोषिक विजेते ब्रिटिश रसायनशास्त्रज्ञ सर सिरिल नॉर्मन हिशेलवूड यांचा जन्म (मृत्यू ९ ऑक्टोबर) 

१९०१ भारतीय गणिती राजचंद्र बोस यांचा जन्म यांनी प्रसिद्ध स्विस गणिती आईलर यांच्या गणित पद्धतीतील त्रूटी आणि चुका निदर्शनास आणून दिल्या, त्यामुळे गणिती जगात यांचे नांव प्रसिद्ध झाले.

 १९०६ नोबेल पारितोषिक विजेते ब्रिटिश जर्मन जीवरसायनशास्त्रज्ञ सर अर्नेस्ट बोरिस चेन यांचा जन्म. (मृत्यू १२ ऑगस्ट) 

१९१० नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ पॉल जॉन फ्लोरी यांचा जन्म (मृत्यू ९ सप्टेंबर) 

१९२२: नोबेल पारितोषिक विजेते डॅनिश पदार्थविज्ञानशास्त्रज्ञ एजे निल्स बोर यांचा जन्म. यांना 'द डेव्हलपमेंट ऑफ द थिअरी ऑफ द स्ट्रक्चर ऑफ द अॅटोमिक न्यूक्लिअस' या संशोधन कार्याबद्दल १९७५ सालाचे पदार्थविज्ञानशास्त्राचे नोबल पारितोषिक विभागून मिळाले .

*१८४७ स्कॉटिश वैद्यकशास्त्रज्ञ सर जेम्स यंग सिंप्सन यांनी प्रसूतीच्या वेळी गुंगी आणण्यासाठी प्रथमच इथरचा उपयोग केला. 

*१९८१ प्रायोगिक भूस्थिर दूरसंचार उपग्रहाच्या निर्मिती कार्यक्रमातील 'अॅपल' हा पहिला भारतीय उपग्रह अंतराळात प्रक्षेपित केला.

जून १७, २०२४

20 जून-विज्ञान दिनविशेष

              20 जून-विज्ञान दिनविशेष

२० जून (हा दिवस जागतिक स्वच्छता दिन म्हणून पाळल्या जातो.)

 १८६१: नोबेल पारितोषिक विजेते ब्रिटिश जीवरसायनशास्त्रज्ञ सर फ्रेडरिक जी हॉपकिन्स यांचा जन्म. यांनी अॅमिनोअॅसिड जीवनासत्त्वाविषयी महत्त्वाचे संशोधन केले. (मृत्यू १६ मे)

१८९७ : डॅनिश गणिती योहान जॅपेटस स्टीन्सट्रॅप यांचे निधन. यांनी अनुवंश शास्त्रात मोलाची 'कामगिरी केली. (जन्म: ८ मार्च) 

१९१७ : अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ जेम्स मॅसॉन क्रॅफ्टस यांचे निधन. यांनी अॅल्यूमिनिअम धातूसंबंधी संशोधन केले. रसायनशास्त्रात यांच्या नावाने 'फ्रिडेल क्रॅफ्टस रिअॅक्शन' प्रसिद्ध आहे. (जन्म: ८ मार्च) 

१९६६ : विश्वनिर्मितीचा महास्फोट सिद्धान्तपट (बिग बँग थिअरी) चा प्रस्ताव तयार करणारे सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ जॉर्ज लेमायट्रे यांचे निधन. बिंदूवत जागेत अफाट उर्जा आणि वस्तू एकत्र आल्यामुळेच महास्फोट होऊन विश्व जन्मास आले. असे त्यांचे म्हणणे होते. हीच कल्पना आज सर्वमान्य होते आहे. 

१९८७ : प्रसिद्ध भारतीय पक्षितज्ञ डॉ. सलीम अली यांचे निधन. त्यांनी पक्षिजीवनाचे अत्यंत जवळून आणि बारकाईने निरीक्षण केले. पक्षिजीवनाचा आणि दिनक्रमाचा सखोल अभ्यास केला. विख्यात पक्षितज्ञ म्हणून अजरामर झाले. (जन्म: १२ नोव्हेंबर)

जून १७, २०२४

21 जून-विज्ञान दिनविशेष

             21 जून-विज्ञान दिनविशेष


★२१ जून १७८१ : फ्रेंच रसायनशास्त्रज्ञ सिमेअन डेनिस पॉईसन यांचा जन्म. (मृत्यू: २५ एप्रिल) 

★१८४६ : ब्रिटिश रसायनशास्त्रज्ञ जेम्स मार्श यांचे निधन. आर्सेनिक टेस्टचा निर्माता म्हणून प्रसिद्ध असून या टेस्टला यांचेच नाव देण्यात आले. यांनी विषारी द्रव्यासंबंधी मोलाचे संशोधन केले. (जन्म: २ सप्टेंबर)

 ★१८५७ : फ्रेंच रसायनशास्त्रज्ञ बॅनॉर लुईस देनार यांचे निधन. यांनी १८१८ मध्ये हायड्रोजन पेरॉक्साईड चा शोध लावला. (जन्म : ४ मे) 

★१८६३ : डार्क नेब्यूलाचा शोध घेणारे जर्मन खगोलशास्त्रज्ञ मॅक्झिमिलन फॅन्स जोसेफ कार्नेलियस वूल्फ यांचा जन्म. (मृत्यू: १० मार्च) 

★१८७४ : स्वीडिश पदार्थविज्ञानशास्त्रज्ञ अँडर्स यान्स अँगस्ट्रॉम यांचे निधन. सौर वातावरणात हायड्रोजन असल्याचे सर्वप्रथम यांनीच सांगितले. तसेच सूर्यवर्णपटासंबंधी संशोधन केले. (वर्णपटातील तरंगविस्तार मोजण्याकरिता जे एकक वापरले जाते, त्यास यांचेच नाव देण्यात आले.) 

★१८८० : अमेरिकन शरीरशास्त्रज्ञ आर्नोल्ड ल्युसिअस गेझेल यांचा जन्म. (मृत्यू: २९ मे)

★१९५७ : सुप्रसिद्ध जर्मन पदार्थविज्ञानशास्त्रज्ञ योहान्स स्टार्क यांचे निधन. यांना 'द डिस्कव्हरी ऑफ द डाप्लर इफेक्ट इन कॅनल रेज अॅण्ड स्पिलिंग ऑफ स्पेक्ट्रल लाईन्स इन इलेक्ट्रिक फिल्ड' या संशोधन कार्याबद्दल १९१९ सालाचे पदार्थविज्ञानशास्त्राचे नोबेल पारितोषिक मिळाले. 'स्टार्कइफेक्ट' म्हणून यांचा एक सिद्धान्त प्रसिद्ध आहे. (जन्म: १५ एप्रिल)

जून १७, २०२४

22 जून-विज्ञान दिनविशेष

              22 जून-विज्ञान दिनविशेष


★२२ जून १८६४ : लिथुआनिया देशातील प्रख्यात शास्त्रज्ञ हर्मन मिन्कोवस्की यांचा जन्म. यांनी चतुर्मिती विश्वाची अभिनव संकल्पना मांडली. (मृत्यू १२ जून)

 ★१९०६ : जर्मन प्राणिशास्त्रज्ञ फ्रिटझ रिचर्ड शॉडिन यांचे निधन. सन १९०५ मध्ये उपदंश निर्माण करणाऱ्या (स्पायरोच्छाईश पॅलिडा) चा शोध लावला. तसेच ट्रायसॅनोसोम्स संबधी महत्त्वाचे संशोधन केले. (जन्म: १९ सप्टेंबर)

 ★१९४० : रशियन हवामान शास्त्रज्ञ ब्लाडियार पी कोलेन यांचे निधन. यांनी सूर्यावरील उष्णता व पावसाचा वर्षाव यांच्या संबंधी दीर्घ संशोधन केले. हवामान शास्त्रातील एक शास्त्रज्ञ म्हणून यांचा लौकिक आहे.

★१९१० व्यापारी तत्त्वावरील प्रवाशांची पहिली वाहतूक सुरु झाली. कॉऊंट फॉन झेपेलीन यांनी वीस प्रवाशांना सोबत घेऊन हवाई जहाजाचे स्वतः संचालन केले. 

★१९९९ इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन (इस्त्रो) ने नॅशनल कॉंसिल ऑफ सायन्स म्युझियमच्या सहकार्याने अवकाश विज्ञान व तंत्रज्ञाना विषयीचे हायटेक अवकाश संग्रहालय बनविण्याची योजना सुरु केली. 

★१९९९ चायनीज अॅकडेमी ऑफ सायन्सने 'पांडा' या दुर्मिळ प्राण्याचे क्लोनिंग करण्याचे निश्चित केले.

जून १७, २०२४

23 जून-विज्ञान दिनविशेष

             23 जून-विज्ञान दिनविशेष


 ★१७७५ : फ्रेंच पदार्थविज्ञानशास्त्रज्ञ इटायनी लुई मॅल्यूस यांचा जन्म. (मृत्यू: २३ फेब्रुवारी)

★१८३२ प्रायोगिक भूगर्भशास्त्राचा संस्थापक स्कॉटिश भूगर्भ व रसायनशास्त्रज्ञ सर जेम्स हॉल यांचे निधन (जन्म १७ जानेवारी) 

★१८९१ जर्मन पदार्थविज्ञानशास्त्रज्ञ विल्हेम एडवर्ड विद्युतशास्त्राविषयी महत्त्वाचे संशोधन केले वेबर यांचे निधन. यांनी (जन्म २४ ऑक्टोबर) 

★१९१२ डिजिटल संगणकाच्या संकल्पनेचा प्रस्ताव मांडणारे अमेरिकन गणिती अॅलन ट्युरिंग यांचा जन्म सर्व प्रकारचे गणिती प्रश्न सोडवू शकणाऱ्या यंत्राची संकल्पना यांनी आपल्या शोध निबंधात रेखाटली होती 'ट्युरिंग मशिन' या नावाने ही संकल्पना आता सुप्रसिद्ध आहे.

 ★१९९५ अमेरिकन सूक्ष्मजंतूशास्त्रज्ञ जोनस एडवर्ड साल्क याचे निधन यांनी पोलिओ प्रतिबंधक लस शोधून काढली (जन्म: २८ ऑक्टोबर) 

★१९२७ संध्याकाळी ६ वाजता भारतीय नभोवाणी मुंबईहून अधिकृतपणे प्रसारित झाली आणि भारतीय 'आकाशवाणी युगास' प्रारंभ झाला.

 ★ १९३१ विलीपोस्ट या वैमानिकाने न्यूयॉर्क वरून उड्डाण करून ८ दिवस १५ तास. ५१ मिनिटे. पृथ्वीप्रदक्षिणा पूर्ण करण्याचा विश्वविक्रम केला .

★१९९३ ४२ वर्षीय अॅन्ड्रयू विलीस नावाच्या गणितज्ज्ञांनी फर्माज लास्ट थिअरम सिद्ध केल्याचे घोषित केले, परंतू त्यामध्ये काही त्रूटी होत्याच सरतेशेवटी १९९५ साली परिपूर्ण सिद्धता दिली.

जून १७, २०२४

24 जून-विज्ञान दिनविशेष

             24 जून-विज्ञान दिनविशेष


★१६६१: स्कॉटिश गणिती डेव्हिड ग्रेगरी यांचा जन्म (मृत्यू १० ऑक्टोबर) 

★१७९५ : जर्मन शरीरशास्त्रज्ञ अर्न्स्ट हेन्रीच वेबर यांचा जन्म (मृत्यू २६ जानेवारी)

★१८३५ जर्मन रसायनशास्त्रज्ञ योहान्स अॅडॉल्फ विस्लिसेनस यांचा जन्म (मृत्यू: ६ डिसेंबर) 

★१८५२ : घटसर्पाच्या जंतूचे शोधक जर्मन सूक्ष्मजंतुशास्त्रज्ञ फ्रेड्रिक ऑगस्ट लेफ्लेर यांचा जन्म (मृत्यू: ९ एप्रिल) 

★१८८३: नोबेल पारितोषिक विजेते आस्ट्रियन अमेरिकन पदार्थविज्ञानशास्त्रज्ञ व्हिक्टर फ्रान्झ हेस यांचा जन्म. (मृत्यू १७ डिसेंबर)

★१९४३ सुप्रसिद्ध अमेरिकन पदार्थविज्ञानशास्त्रज्ञ जोसेफ स्वीटमन अमेस यांचे निधन यानी इलेक्ट्रो डायनॅमिक्स, स्पेक्ट्रॉस्कोपी संबंधी संशोधन केले. आणि पदार्थविज्ञानशास्त्रा विषयी लेखन प्रसिद्ध केले (जन्म: ३ जूलै) 

★१८६० लंडन येथील सेंट थॉमस या रुग्णालयात परिचारिकांच्या रीतसर प्रशिक्षणाची सुरवात झाली. 

★१९६१ आशियातील पहिले ध्वनिवेगी विमान भारतात तयार झाले

जून १७, २०२४

25 जून-विज्ञान दिनविशेष

                 25 जून-विज्ञान दिनविशेष


★१८६४ : नोबेल पारितोषिक विजेते जर्मन रसायनशास्त्रज्ञ वॉल्टर हरमन नर्स्ट यांचा जन्म (मृत्यू: १८ नोव्हेंबर) 

★१९०५ : जर्मन खगोलशास्त्रज्ञ रूपार्ट विल्ट यांचा जन्म यांनी बहुतेक ग्रहाच्या भोवती असणाऱ्या वातावरणात हायड्रोजन आणि हेलिअम असल्याचे सिद्ध केले. 

★१९०७ : नोबेल पारितोषिक विजेते जर्मन पदार्थविज्ञानशास्त्रज्ञ जे हन्स डॅनिअल जिन्सन यांचा जन्म. (मृत्यू. ११ फेब्रुवारी)

 ★१९११: नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ विलियम स्टेन यांचा जन्म. यांनी मॉल्यूक्यूलर स्ट्रक्चर ऑफ प्रोटिन्स या संबंधी महत्त्वाचे संशोधन केले. यांना 'अंडरस्टैंडिंग ऑफ द कनेक्शन बिटविन केमिकल स्ट्रक्चर अॅण्ड कॅटलिटिक अॅक्टिव्हिटी ऑफ द अॅक्टिव्ह सेंटर रिबोन्यूक्लिज मॉलूक्यूल' या संशोधन कार्याबद्दल १९७२ सालाचे रसायनशास्त्राचे नोबेल पारितोषिक विभागून मिळाले. 

★१९३९ : ब्रिटिश खगोलशास्त्रज्ञ सर फ्रैंक वॅटसन डॉयसॉन यांचे निधन. हा रॉयल अॅस्ट्रॉनॉमिकल सोसायटीचा सचिव होता. अस्ट्रॉनॉमर रॉयल म्हणून स्काटलंडने यांचा बहुमान केला (जन्म: ८ जानेवारी)

★१९६२: ब्रिटिश रसायनशास्त्रज्ञ हर्बर्ट ब्रेर्टन बेकर यांचा जन्म (मृत्यू २७ एप्रिल) 

★१९९५  सुप्रसिद्ध आयरिश पदार्थविज्ञानशास्त्रज्ञ अर्नेस्ट थॉमस सिंटॉन वाल्टन यांचे निधन यानी लिथियम वर प्रोटॉनचा मारा करून लिथिअमचा न्यूक्लिअस दुभंगण्याचा प्रयत्न केला यांना 'द पायोनिअर वर्क ऑन द ट्रान्सम्यूशन ऑफ अॅटोमिक न्यूक्लि बाय आर्टिफिशीयल अॅक्सिलरेटेड अॅटोमिक पार्टीकल्स' या संशोधन कार्याबद्दल १९५१ सालाचे पदार्थविज्ञान शास्त्राचे नोबेल पारितोषिक विभागून मिळाले (जन्म ६ ऑक्टोबर)

★१९९७ : 'स्कूबा डायव्हिंग किंवा अॅक्वालांग (पाण्याखाली श्वासोच्छवासास मदत करणारी यंत्रणा) चे जनक' जॅक्विस कौस्तेयू यांचे निधन. अक्वालंगमुळे पाण्याखालील संशोधनात अभूतपूर्व क्रांती झाली. कॉस्तेयूं यांनी शार्क, डॉल्फिन, व्हेल वगैरे जलचर प्राण्याचे संशोधन करून अनेक व्हिडिओफिल्म्स बनविल्या यांनी सन १९७४ मध्ये जलचर जीवाच्या सुरक्षिततेसाठी कौस्तेयू सोसायटी स्थापन केली.

 ★१८७६ अलेक्झांडर ग्रहम बेल यांनी अमेरिकेतील फिलाडेल्फिया येथे भरलेल्या शतसांवत्सरिक प्रदर्शनामध्ये आपल्या दूरध्वनीचे प्रात्यक्षिक सादर केले 

★१९९७ 'मीर' अवकाश स्थानकाला सामान पुरवठा करणारे प्रोग्रेस-एम हे अवकाशयान मीरला जोडलेल्या स्पेक्टर नावाच्या मोडयूलला जाऊन धडकले. या अपघातातून मीर बचावले खरे पण तो त्यांना शेवटचाच धक्का ठरला.

जून १७, २०२४

26 जून-विज्ञान दिनविशेष

          26 जून-विज्ञान दिनविशेष


★ २६ जून (जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिन) १८२४ : 'तापमान मापनपद्धतीचा जनक' विल्यम् केल्विन यांचा जन्म. (मृत्यू: १७ डिसेंबर) 

★१९४३ : सुप्रसिद्ध अमेरिकन ऑस्ट्रियन शरीरशास्त्रज्ञ कार्ल लँडस्टेनर यांचे प्रयोगशाळेत संशोधनामध्ये मग्न असतांना निधन. यांनी मानवी रक्ताचे चार गट पाडले. यांना 'द डिस्कव्हरी ऑफ ह्यूमन ब्लड गुप्स' या संशोधन कार्याबद्दल १९३० सालाचे वैद्यकशास्त्राचे नोबेल पारितोषिक मिळाले. यामधूनच पुढे रक्तपेढ्यांची मुहूर्तमेढ रोवली गेली. (जन्म: १४ जून)

 ★१९९३ नॅव्हस्टार या मालिकेतील २४ वा उपग्रह आकाशात प्रक्षेपित करून अमेरिकेने पृथ्वीवरील स्थाननिश्चिती करणारी यंत्रणा पूर्ण केली. ग्राऊंड पोझिशनिंग सिस्टिम असे या प्रणालीचे नाव आहे. जीपीएस या नावाने ही यंत्रणा ओळखली जाते.

★२००० रोजी 'ह्यूमोन जिनोम प्रकल्प' यशस्वी होवून मानवाच्या जनुकीय कुंडलीचा आराखडा तयार झाला या प्रकल्पात विविध देशातील अकराशेहून जास्त शास्त्रज्ञांनी अहोरात्र संशोधन केले. हा प्रकल्प यशस्वी होण्यास १३ वर्षे लागली. अपेक्षेपेक्षा दोन वर्ष अगोदर हा प्रकल्प पूर्ण झाला.

जून १७, २०२४

27 जून-विज्ञान दिनविशेष

                27 जून-विज्ञान दिनविशेष


★१८२२ : ऑस्ट्रियन जीवशास्त्रज्ञ योहान ग्रेगर मेंडेल यांचा जन्म. (मृत्यू: ६ जानेवारी) 

★१८२७ : ब्रिटिश संशोधक सॅम्युअल क्रॉम्टन यांचे निधन. यांनी सूत कातण्याच्या मागामध्ये अनेक सुधारणा घडवून एक नवा माग तयार केला. यामुळे कापड विणण्याच्या क्षेत्रात प्रगती घडून आली. (जन्म: ३ डिसेंबर) 

★१८६९ : नोबेल पारितोषिक विजेते जर्मन प्राणिशास्त्रज्ञ हॅन्स स्पेमन यांचा जन्म. (मृत्यू: १२ सप्टेंबर)

 ★१८७६ : जर्मन निसर्गशास्त्रज्ञ ख्रिश्चन गॉट फ्राईड एहरेनबर्ग यांचे निधन. 'समुद्राच्या पाण्यातील स्वयंप्रकाशन हे त्यातील सेंद्रिय सृष्टीशी संबंधित असते असे यांनी सिद्ध केले. 

★१८८३ : प्रसिद्ध ब्रिटिश गणिती व पदार्थविज्ञान शास्त्रज्ञ विल्यम् स्पॉटिवूड यांचे निधन. यांनी प्रकाशाचे धृवीकरण यासंबंधी यांनी मोलाचे संशोधन केले. काही काळ रॉयल सोयायटीचे अध्यक्ष होते. (जन्म: ११ जानेवारी)

 ★१८९७ : फ्रेंच रसायन शास्त्रज्ञ पॉल शुल्झेनबर्ग यांचे निधन. रंग आणि फर्मेन्टेशन क्रिया या संबंधी महत्त्वपूर्ण संशोधन केले. (जन्म : २३ डिसेंबर)

 ★१९५४ सोवियत रशियामध्ये मास्कोजवळ ५००० किलोवॅट क्षमतेच्या रशियातील पहिल्या अणुउर्जा केंद्राची स्थापना झाली.

जून १७, २०२४

28 जून-विज्ञान दिनविशेष

 28 जून-विज्ञान दिनविशेष


★२८ जून १८५२ : स्वीडिश खनिज शास्त्रज्ञ विल्हेन हिसींगर यांचे निधन यांनी बर्झलियस बरोबर संशोधन करून सेरियम नावाचे खनिज शोधून काढले. (जन्म: २२ डिसेंबर) 

★१८७३ : 'अवयवरोपणाचे उद्‌गाते' नोबेल पारितोषिक विजेते फ्रेंच अमेरिकन शरीरविज्ञानशास्त्रज्ञ डॉ. अलेक्सीज कॅरेल यांचा जन्म (मृत्यू: ५ नोव्हेंबर)

★१९०६ नोबेल पारितोषिक विजेत्या अमेरिकन पदार्थविज्ञानशास्त्रज्ञा मेरिया जिओपर्ट मेयर यांचा जन्म, (मृत्यू: २० फेब्रुवारी) 

★१९४३ नोबेल पारितोषिक विजेते जर्मन पदार्थविज्ञानशास्त्रज्ञ फॉन क्लाऊस क्लिटझिंग यांचा जन्म यांना 'द डिस्कव्हरी ऑफ क्वांटिझड् हॉल इफेक्ट' या संशोधन कार्याबद्दल १९८५ सालाचे पदार्थविज्ञानशास्त्राचे नोबेल पारितोषिक मिळाले. 

★१९७२ : प्रसिद्ध भारतीय संख्याशास्त्रज्ञ प्रशांतचंद्र महालनोबिस यांचे निधन. यांनी कलकत्ता येथे 'भारतीय संख्याशास्त्र संस्थे' ची स्थापना केली (जन्म: २९ जून)

जून १७, २०२४

29 जून-विज्ञान दिनविशेष

             29 जून-विज्ञान दिनविशेष



 १८१८ इटालियन खगोलशास्त्रज्ञ अँजीलो सेकी यांचा जन्म. (मृत्यू: २६ फेब्रु.) 

१८३३ 'द लॉ ऑफ मास ऑफ अॅक्शन' या सिद्धान्ताचे जनक नार्वेजियन रसायनशास्त्रज्ञ पीटर वॉग यांचा जन्म. (मृत्यू: १३ जानेवारी)

१८६० ब्रिटिश वैद्यकशास्त्रज्ञ थॉमस अॅडिसन यांचे निधन. अॅनिमिया रोगावरील यांचे संशोधन विशेष महत्त्वाचे असून दुसऱ्या प्रकारचा अॅनिमिया याचे नावानेच प्रसिद्ध आहे. उदरपिंडाच्या रोगासंबंधी संशोधन केले. या रोगासही यांचेच नाव मिळाले आहे. 

१८६१ : अमेरिकन शल्यकर्मज्ञ विल्यम् जेम्स मेयो यांचा जन्म (मृत्यू: २८ जून) 

१८९० ब्रिटिश रसायनशास्त्रज्ञ अलेक्झांडर पार्किंग यांचे निधन. यांनी (झायलोनाईट) चा शोध लावला. तसेच विद्युतलेपण (इलेक्ट्रोप्लेटींग) संबंधी मौलिक संशोधन केले. (जन्म: २९ डिसेंबर) 

१८९३ प्रसिद्ध भारतीय संख्याशास्त्रज्ञ प्रशांतचंद्र महालनोबिस यांचा जन्म. (मृत्यू: २८ जून)

१८९५ : ब्रिटिश जीवशास्त्रज्ञ थॉमस हेन्री हक्स्ले यांचे निधन. डार्विन प्रमाणणे यांनीही रॅटलस्नेक या जहाजावरून जगाचा प्रवास केला. (जन्म : ४ मे)

 १९९२ : सुप्रसिद्ध ब्रिटिश रसायनशास्त्रज्ञ पिटर डेनिस मिटचेल यांचे निधन. यांना 'द बायोलॉजीकल एनर्जी ट्रान्सफर थु द फॉर्म्यूलेशन ऑफ द केमि-ऑस्मिटिक थिअरी' या संशोधन कार्याबद्दल १९७८ सालाचे रसायनशास्त्राचे नोबेल पारितोषिक मिळाले. यांनी 'अॅडेनोसाईन ट्रायफॉस्फीर' नावाचे संयूग शोधून काढले. त्यामुळे प्राणी जीवनातील अनेक समस्यांचा उलगडा झाला. (जन्म: २९ सप्टेंबर)

*१९९५ अमेरिकेच्या शंभराव्या मानवासहित अवकाश उड्डाणाचे निमित्य साधून अॅटलान्टिस स्पेस शटल रशियाच्या मीर अवकाश स्थानकाशी जोडण्यात आले.

जून १७, २०२४

30 जून-विज्ञान दिनविशेष

            30 जून-विज्ञान दिनविशेष

★१६६० : ३० जून प्रसिद्ध ब्रिटिश गणिती विल्यम ऑट्रेड यांचे निधन. गुणाकाराचे चिन्ह यांनीच प्रचारात आणले. तसेच टिंग्नामेंट्री मधील साईन, कोसाइन, टॅजेट या संज्ञा सर्वप्रथम यांनीच वापरल्या. (जन्म : ५ मार्च)

 ★१९१९ : सुप्रसिद्ध ब्रिटिश पदार्थविज्ञानशास्त्रज्ञ जॉन विल्यम स्ट्रट रॅले यांचे निधन. यांनी सन १९०८ मधे अॅरगॉन या मूलद्रव्याचा शोध लावला. यांना 'द इन्व्हेस्टीगेशन ऑफ द डेंसिटीजऑफ द मोस्ट इंम्पॉर्टटन्ट गॅसेस अॅण्ड डिस्कव्हरी ऑफ ऑरगान' या संशोधन कार्याबद्दल १९०४ सालाचे पदार्थविज्ञानशास्त्राचे नोबेल पारितोषिक मिळाले.

 ★१९२६ : (जन्म: १२ नोव्हेंबर) नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ पौल बर्ग यांचा जन्म. यांना 'द फंडामेंटल स्टडीज ऑफ द बायोकेमेस्ट्री ऑफ न्यूक्लिड अॅसिड विथ पर्टिक्यूलर रिगार्ड टू कांबिनंट डीएनए' या संशोधन कार्याबद्दल १९८० सालाचे रसायनशास्त्राचे नोबेल पारितोषिक विभागून मिळाले. ★१९०८: पहाटे आकाशातून एक वस्तू सरसरत आली आणि रशियातील सैबेरिया प्रदेशात असलेल्या तुगंस्का नदीकाठाच्या जंगलात कोसळली. त्या अज्ञात वस्तूचा अवकाशात असतानाच स्फोट झाला. या स्पोटाचे सामर्थ्य हिरोशिम्गवर टाकलेल्या अणुबाँबच्या २००० पट पेक्षाही जास्त होते. या कि.मी. त्रिज्येतील सर्व वृक्ष भूईसपाट झाले.

★१९७१ सोयुझ-११ मधील अंतराळ वीर पृथ्वीवर परत येत असतांना ऑक्सिजन अभावी तिघांचाही हृदयद्रावक अंत झाला.

 ★२००४ 'नासा' युएसए आणि सतरा देशाच्या मदतीने शनी ग्रहाचा आणि त्याच्या उपग्रहांचा अभ्यास करण्यासाठी १५ ऑक्टोबर १९९७ रोजी 'कॅसिनी- ह्युजेन्स' हे अवकाशयान पाठविण्यात आले होते. सात वर्षे आणि ३.५ अब्ज कि.मी. चा प्रवास करून हे अवकाशयान ३० जून २००४ रोजी शनीच्या कक्षेत पोहचले.

शनिवार, १५ जून, २०२४

जून १५, २०२४

15 जून-विज्ञान दिनविशेष

 १५ जून



 ★१६७१ : इटालियन खगोलशास्त्रज्ञ गायव्हॅनी बेंटिस्टा रीटकॉहली यांचे निधन. यांनी चंद्रासंबंधी संशोधन केले. तसेच सन १६५७ मध्ये मिझर या ताऱ्याच्या संशोधनासाठी दुर्बिणीचा उपयोग केला. (जन्म १७ एप्रिल) 

★१८७९ अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ सॅम्यूअल कॉलव्हिल लिंड यांचा जन्म. यांनी इलेक्ट्रोस्कोप तयार केला. तसेच रेडीओ अॅक्टीव्हिटी आणि फोटो केमिस्ट्री या विषयात मौलिक संशोधन केले. 

★१९१५ : नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकन सूक्ष्मजंतुशास्त्रज्ञ थॉमस हकल वेलर यांचा जन्म. यांना 'द डिस्कव्हरी ऑफ अॅबिलिटी ऑफ पॉलीमिलेटिस व्हायरसेस टू ग्रो इन कल्चर्स ऑफ व्हेरिएस टाईप्स ऑफ टिश्यू' या संशोधन कार्याबद्दल १९५४ सालाचे वैद्यकशास्त्राचे नोबेल पारितोषिक विभागून मिळाले.

★१९७१ सुप्रसिद्ध अमेरिकन जीवरसायनशास्त्रज्ञ विंडेल मेरेडिथ स्टॅनले यांचे निधन यांनी संक्रामक सूक्ष्म जीवाणू या विषयी मोलाचे संशोधन केले यांना 'द प्रिपरेशन ऑफ एन्झिम्स अॅण्ड व्हायरस प्रोटिन्स इन प्युअर फॉर्म' या संशोधन कार्याबद्दल १९४६ सालाचे रसायनशास्त्राचे नोबेल पारितोषिक विभागून मिळाले. (जन्म: १६ ऑगस्ट)

★१७५२ सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ बेंजामिन फ्रैंकलीन यांनी आकाशात चमकणारी वीज आणि इतरत्र आढळणारी वीज या संबंधी फिलाडेल्फिया येथे एक यशस्वी प्रयोग केला.

 ★१७७४ ब्रिटिश अॅडमिरल सर जॉर्ज एन्सन यांनी आजच्या दिवशी जहाजाने जगाची सफर पूर्ण केली.

जून १५, २०२४

8 जून -विज्ञान दिनविशेष

 8 जून -विज्ञान दिनविशेष



★१६२५ : ८ जून फ्रेंच खगोलशास्त्रज्ञ जॉ डॅमिनिको कासिनी यांचा जन्म  (मृत्यू: ११ सप्टेंबर)

★१६९५ : डच गणिती व पदार्थविज्ञानशास्त्रज्ञ ख्रिश्चन हायगंझ याचे निघन यानी शनिचा आयपेटस् नावाचा उपग्रह शोधून काढला, तसेच एका वाताकर्षक पंपाचाही शोध लावला (जन्म: १४ एप्रिल)

★१८६३: जर्मन रसायनशास्त्रज्ञ फ्रेड्रिक ऑगस्ट राशिंग यांचा जन्म  (मृत्यू: ४ फेब्रुवारी) 

★१९१६:नोबेल पारितोषिक विजेते ब्रिटिश वैद्यकशास्त्रज्ञ फ्रॉन्सिस हॅरी कॉम्प्टन क्रिक यांचा जन्म यानी डीएनए च्या रेणूंच्या रासायनिक गुणधर्माचा सखोल अभ्यास केला याना 'द डिस्कव्हरीज कन्सर्निंग द माल्यूक्यूलर स्ट्रक्चर ऑफ न्यूक्लिइक अॅसिड्स अॅण्ड इट्स सिग्निफीकन्स फॉर इन्फरमेशन ट्रान्सफर इन लिव्हिंग मटेरियल' या संशोधन कार्याबद्दल १९६२ सालाचे वैद्यकशास्त्राचे नोबेल पारितोषिक विभागून मिळाले .

★१९२० इटालियन पदार्थविज्ञानशास्त्रज्ञ आगस्टो रिगी यांचे निधन यांनी रेडिओलहरींचा अभ्यास करून विद्युत चुंबकीय वर्णपटाचे निरीक्षण केले (जन्म: २७ ऑगस्ट) 

★१९३६ नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकन पदार्थविज्ञानशास्त्रज्ञ केनिथ गेडेस विल्सन यांचा जन्म यांना 'द क्रिटिकल फिनॉमिना इन कनेक्शन विथ द फेज ट्रान्सिशन्स' या संशोधन कार्याबद्दल १९८२ सालाचे पदार्थविज्ञानशास्त्राचे नोबेल पारितोषिक मिळाले. 

★१९४७ नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकन वैद्यकशास्त्रज्ञ इरिक एफ वाईश्चाऊस यांचा जन्म यांना 'द जिनेटिक कंट्रोल ऑफ अलिं एम्बायॉनिक डेव्हलेपमेंट' या संशोधन कार्याबद्दल १९९५ सालाचे वैद्यकशास्त्राचे नोबेल पारितोषिक विभागृन मिळाले.

 ★१८६६ 'एडिफिट' नावाने ओळखली जाणारी उल्का वृष्टी झाली 

१९४८ पासून भारत ब्रिटन विमान सेवा सुरु झाली 

★ २००४ शुक्राचे अधिक्रमण ही घटना १२१५ वर्षांनी झाली.

जून १५, २०२४

7 जून विज्ञान दिनविशेष (भारतीय रेडक्रॉस दिन)

 ७ जून (भारतीय रेडक्रॉस दिन) 



१८११ : 'क्लोरोफॉर्मचे जनक' स्कॉटिश वैद्यकशास्त्रज्ञ सर जेम्स यंग सिंप्सन यांचा जन्म (मृत्यू: ६ मे)  एडवर्ड 

१८६२ : नोबेल पारितोषिक विजेते जर्मन पदार्थविज्ञानशास्त्रज्ञ फिलिप एडवर्ड अॅन्टान-लेनॉर्ड यांचा जन्म (मृत्यू: २० मे)

 १८७७ नोबेल पारितोषिक विजेते ब्रिटिश पदार्थविज्ञानशास्त्रज्ञ चार्ल्स ग्लोव्हर बारकला यांचा जन्म (मृत्यू: २३ ऑक्टोबर)

 १८९६ : नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ रॉबर्ट सॅडर्सन मल्लीकेन यांचा जन्म यांना 'केमिकल बॉण्डस् अॅण्ड द इलेक्ट्रानिक स्ट्रक्चर ऑफ मॉलेक्यूल्स बाय् द मॉलेक्यूलर ऑरिबिटल मेथड' या संशोधन कार्याबद्दल १९६६ सालाचे रसायनशास्त्राचे नोबेल पारितोषिक मिळाले. 

 १९३२ : अमेरिकन शल्यकर्मज्ञ विल्यम कीन् यांचे निधन यांनी नैसर्गिक दाढेच्या जागी रबराच्या दाढेचे रोपण करण्यात यश मिळविले. या शल्य कौशल्यामुळे यांची युरोपभर कीर्ती पसरली (जन्म: १९ जानेवारी)

 १९७८: सुप्रसिद्ध ब्रिटिश रसायनशास्त्रज्ञ रोनॉल्ड जॉर्ज ब्रेफोर्ड नॉरिश यांचे निधन यांनी फ्लॅशफोटोलिसीस आणि कायनेटिक स्पेक्ट्रोस्कोपी यासंबंधी संशोधन केले. यांना 'रिअॅक्शन कागनेटिक्स आणि फोटोकेमिकल रिअॅक्शन्स' या संशोधन कार्याबद्दल १९६७ सालाचे रसायनशास्त्राचे नोबल पारितोषिक मिळाले. (जन्म: ९ नोव्हें.) 

१९९२ पर्यावरण संरक्षण विषयक जागतिक पातळीवरील पहिली वसुंधरा परिषद ब्राझिल मधील रिओडी जानिरो येथे सुरु.

गुरुवार, १३ जून, २०२४

जून १३, २०२४

14 जून विज्ञान दिनविशेष

 १४ जून 


★१७४६: स्कॉटिश गणितशास्त्रज्ञ कॉलिन मॅक्लॉरिन यांचे निधन यानी न्यूटनच्या गणितासंबंधी महत्त्वाचे संशोधन केले. 

★१८३२ 'ऑटो इंजिनचे जनक' निकोलस ऑगस्ट ऑटो यांचा जन्म (मृत्यू: २६ जानेवारी) 

★१८६८ : 'मानवी रक्तगटाचे जनक' नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकन आस्ट्रियन शरीरशास्त्रज्ञ कार्ल लँडस्टेनर यांचा जन्म. यांच्या संशोधनामुळे पुढे रक्तपेढींची सुरुवात झाली. (मृत्यू: २६ जून)

 ★१८८०: प्रसिद्ध भारतीय ग्रामीण शास्त्रज्ञ सतिशचंद्र दासगुप्ता यांचा जन्म (मृत्यू: २४ डिसेंबर)

 ★१९०३ : उत्क्रांतिवादाचा थोर पुरस्कर्ता जर्मन शरीरशास्त्रज्ञ कार्ल गॅगेनबावर यांचे निधन यांनी गर्भविज्ञानशास्त्रात मोलाचे संशोधन केले (जन्म: २१ ऑगस्ट)

★१९२४ नोबेल पारितोषिक विजेते ब्रिटिश वैद्यकशास्त्रज्ञ सर जेम्स ब्लॅक यांचा जन्म यांनी विविध रोगांवर प्रभावी औषधांचा शोध लावला. मज्जातंतूच्या पेशीसंबंधी मौलिक संशोधन केले. यांना 'द डिस्कव्हरीज ऑफ इम्पॉर्टट प्रिन्सिपल्स फॉर ड्रग ट्रिटमेंट' या संशोधन कार्याबद्दल १९८८ सालाचे वैद्यकशास्त्राचे नोवेल पारितोषिक विभागून मिळाले.

★ १९४६ 'दूरचित्रवाणी चे जनक' स्कॉटिश संशोधक जॉन लॉगी बेअर्ड यांचे निधन यानी सन १९२५ रोजी दूरचित्रवाणीचे प्रात्यक्षिक सर्वांना दाखविले, सन १९२९ मध्ये जर्मनी व लंडन दरम्यान दूरचित्रवाणीची व्यवस्था सुरु झाली यांच्या संशोधनामुळे करमणूक क्षेत्रात क्रांती घडून आली. आधुनिक युगात दूरचित्रवाणी एक मुख्य करमणुकीचे आणि लोक जागृतीचे साधन बनले आहे. (जन्म १३ ऑगस्ट) ★१९१४ भारतीय बनावटीचा अत्याधुनिक रणगाडा भारतीय युद्धसेनेत दाखल .

★१९६३ सोवियत रशियाचे व्होस्टोक ५ अंतराळवीर व्हॅलेरी बिकोव्हस्की यांचे सह अवकाशात प्रक्षेपित केले ५ दिवसात ८१ पृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण करून १९ जून रोजी पृथ्वीवर सुखरूप परत आले .

★१९८६ भारतातील पहिल्या टेस्टट्यूब बेबीचा जन्म.

बुधवार, १२ जून, २०२४

जून १२, २०२४

13 जून विज्ञान दिनविशेष

 १३ जून 



★१६६८ : अमेरिकन पदार्थविज्ञानशास्त्रज्ञ वॅलेस क्लेमट सॅबिन यांचा जन्म (मृत्यू: १० जानेवारी) 

★१८५४ : ब्रिटिश संशोधक सर चार्ल्स अल्गरनॉन पार्सन्स यांचा जन्म. (मृत्यू: ११ फेब्रु.) 

★१८७० : नोबेल पारितोषिक विजेते बेल्जियम सूक्ष्मजंतुशास्त्रज्ञ ज्यूल्स जॉ बौप्टिस्ट बॉर्डेट यांचा जन्म. (मृत्यू: ६ एप्रिल)

 ★१९११ : जर्मन अमेरिकन पदार्थविज्ञानशास्त्रज्ञ आयर्विन विल्हेम म्युलर याचा जन्म, यांनी सूक्ष्मदर्शकाचा अभ्यास करून अनेक सुधारणा केल्या. फिल्ड एमिशन मायक्रोस्कोप तयार केला. त्यामुळे अतिसूक्ष्मकणाचा अभ्यास करणे साध्य झाले. 

★१९११ : अमेरिकन नोबेल पारितोषिक विजेते पदार्थविज्ञानशास्त्रज्ञ लुईस डब्ल्यू अल्वेरिज यांचा जन्म यांना 'द डिस्कव्हरी ऑफ लार्जनंबर ऑफ रिझोनन्स सेट्स' या संशोधन कार्याबद्दल १९६८ सालाचे पदार्थविज्ञानशास्त्राचे नोबेल पारितोषिक मिळाले. (मृत्यू: १ सप्टेबर)

★१९३८ : सुप्रसिद्ध फ्रेंच पदार्थविज्ञानशास्त्रज्ञ चार्ल्स एडवर्ड ग्यूलेम यांचे निधन यानी फेरोनिकेल अलॉय (निकेल स्टील मिश्रित धातू) चा शोध लावला यांना 'द प्रिसिअस मेझरमेंटस इन फिजीक्स बाय हिज डिस्कव्हरी ऑफ अनॉमिलीज इन निकेल अॅण्ड स्टील अलॉय' या संशोधन कार्याबद्दल १९२० सालाचे पदार्थविज्ञानशास्त्राचे नोबेल पारितोषिक मिळाले. (जन्म १४ फेब्रुवारी)

★ १९७२ : सुप्रसिद्ध अमेरिकन पदार्थविज्ञानशास्त्रज्ञ जॉर्ज फॉन बेकसे यांचे निधन यांना 'द फिजिकल मेकॅनिझम ऑफ स्टिम्यूलेशन विदिन द कॉक्लिया या संशोधन कार्याबद्दल १९६१ सालाचे वैद्यकशास्त्राचे नोबेल परितोषिक मिळाले.

 ★१९७९ (जन्म: ३ जून) कॅलिफोर्नियातील पॅसाडेना येथील डॉ. पॉल मॅक क्रेडी यांनी केवळ स्नायू उर्जा वापरून विमान चालविले आणि ३२ किमी रूद इंग्लीश खाडी यशस्वीरित्या पार केली, आणि हन्री क्रेमरने जाहीर केलेले १ लाख र्पोडाचे दुसरे बक्षिसही जिंकले.